Share

‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’

Published On: 

🕒 1 min read

जळगाव:- रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. याचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे. सध्या या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख दिसत नाहीये. तो आक्षेपर्ह उल्लेख तत्काळ हटवण्यात आला असल्याची शक्यता आहे.

केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. जेव्हा रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात अद्याप भाजापाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असं अनिल देशमुख ट्विटरवर म्हणाले आहेत.

दरम्यान आता ह्या प्रकरणावर खुद्द रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी संकेतस्थळावरील आक्षेपार्ह उल्लेखाची दखल घेतली, ही चांगली बाब आहे. परंतु, दुसरीकडे मला वाईट या गोष्टीचे वाटले की त्यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, अशा शब्दांत भाजप खासदार रक्षा खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!