Share

दिल्लीत घडलेल्या घटनेची चौकशी करून जबाबदार लोकांवर कारवाई झालीच पाहिजे : आठवले

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत मागील ६४ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथील काही आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली धरली आहे.

२६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली.

या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चावेळी आंदोलकांनी घातलेल्या हैदोसाला दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना जबाबदार धरलं आहे. आंदोलकांना भडकावल्या प्रकरणी राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर, योगेंद्र यादव यांच्यासह ३७ शेतकरी नेत्यांवर देखील विविध प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत

प्रजासत्ताक दिनी जगाचे भारत देशाकडे लक्ष लागलेले असताना त्याच दिवशी शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत आततायीपणा केला. आंदोलनाचा अतिरेक करीत लालकिल्ल्यावर ताबा घेत हिंसक आंदोलन करणे हा लोकशाहीवर, प्रजासत्ताक दिनावर डाग लावण्याचा कलंक फासण्याचा निषेधार्ह प्रकार दिल्लीत घडला आहे. याची चौकशी करून जबाबदार लोकांवर कारवाई झाली पाहिजे. असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!