Share

आर्थिक सर्वेक्षण न छापणे हीच सरकारची उत्तम कामगिरी ; चिदंबरम यांचा मोदी सरकारला टोला

Published On: 

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणावर चांगलेच तोंडसुख घेत सरकारची खिल्ली उडवली आहे. हे आर्थिक सर्वेक्षण छापील स्वरूपात प्रसारित करायचे नाही असे जो निर्णय सरकारने घेतला आहे तोच त्यांचा सर्वोत्तम निर्णय म्हणावा लागेल. आपल्या सरकारने दूरदृष्टीने विकासाचे निर्णय घेतले म्हणूनच देशाच्या आर्थिक व्यवस्थेत आता सुधारणा दिसून येऊ लागल्या आहेत, असे स्वतःच नमूद करून सरकारने स्वतःचीच पाठ थोपटून घेतली आहे, असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.

कोरोनाचे घातपर्व हळूहळू निरोप घेत असताना भारताची अर्थव्यवस्था नेमकी कुठे आहे, याचे चित्र सादर करणारा ‘आर्थिक पाहणी अहवाल’ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेला सादर केला आहे. या अहवालामधून लवकरच सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची काही चाहूल लागते. याच पार्श्वभूमीवर पी. चिदंबरम म्हणाले कि "या वेळेच्या सर्वेक्षणाचा हेतू मात्र भलतेच काही तरी भासतो आहे. पण हा नेमका काय हेतू आहे हेही यातून स्पष्ट झालेले नाही. सरकारने शुक्रवारी आर्थिक सर्वेक्षण जाहीर केले पण ते यावेळी छापील स्वरूपात सादर केले गेलेले नाही. त्याची डिजिटल आवृत्ती प्रसारित केली गेली असल्याचे सरकारने म्हटले आहे.

आपल्या ट्विटर अकौंटवर त्यांनी या संबंधात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की देशाच्या एकूण आर्थिक स्थितीची माहिती देशातील नागरिकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी देशात एकेकाळी हे आर्थिक सर्वेक्षण छापील स्वरूपात वितरित केले जात असे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!