औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील वक्फ बोर्डच्या जागेवर १०० कोटींचा घोटाळा झाल्याचे आरोप केले. यात शहरातील बड्या व्यक्तींची नावे घेतली, परंतु घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी करावी त्यानंतर निर्णयाची वाट बघावी, निर्णय झाल्यानंतर थेट आरोप करावे. तसेच खासदारांनी उघड केल्याचा दावा असलेल्या प्रकरणाच्या चौकशीनिशी माहिती घेऊन बोलावे. असे प्रतिउत्तर खा. जलील यांनी जमीन घोटाळ्यात नाव घेतलेले माजी नगरसेवक राजू तनवाणी यांनी दिले.
या प्रकरणाची अर्धवट माहिती खा. इम्तियाज जलील यांना आहे. या प्रकरणाचा करारनामा २०१२ ला झाला असून, २०१८ मध्ये न्यायालयाने स्थगितीसह काम करण्याचे सांगितले. यात कुठलाही गैरव्यवहार झाला नाही. हे प्रकरण खासदारांना माहीत असतं तर तीन वर्षे ते का शांत बसले असते. आणि कागदपत्रे जर चुकीची असती, तर त्या त्या विभागाने आम्हाला काम करण्यापासून आधीच थांबवले असते.
मुळात त्यांना आमचे मतदान मिळाले नाही, परंतु शहरातून त्यांना चांगली मत पडली आहे. त्यामुळे माहिती न घेता आरोप त्यांनी करू नये. लोकांचे ऐकणे थांबवावे आणि स्वतः कागदपत्रे वाचावी म्हणजे शून्याचा घोळ त्यांच्या कडून होणार नाही असे राजू तनवाणी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ११ हजार विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन पेट परीक्षा
- पालिका-वक्फ बोर्डाचा वाद चिघळण्याची शक्यता
- साष्टपिंपळगावमधील मराठा समाजाचे उपोषण मागे
- प्रिंट मेकिंग चित्रांचे प्रदर्शन आणि परीसंवाद वेबिनार
- कचर्याचे ढिगारे संपवण्यासाठी दोन्ही कचरा प्रकल्प १६ तास चालणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

