Share

कोरोना विरुद्धच्या लढ्यात बीसीसीआयची ‘ही’ मोठी मदत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली. या स्पर्धेनंतर अनेक स्तरातुन आयपीएल द्वारे झालेली कमाई कोरोना पिडीतासाठी देण्यात यावी अशी मागणी केली जोर धरू लागली होती.

कोरोनाच्या या लाटीत अपुऱ्या औषधापोटी आणि अपुऱ्या ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. याच पार्श्वभूमिवर बीसीसीआयने १० लीटर क्षमता असलेले तब्बल २००० ऑक्सिजन संच हे कोरोनापीडीतासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिन्याभरात हे संच भारतभर वितरीत केले जाणार आहे. या ऑक्सिजन संचामुळे भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत होईल अशी आशा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुण सिंग धूमाळ यांनी व्यक्त केली आहे. गतवर्षी २०२० मध्ये पण बीसीसीआयने कोरोनापीडीतासाठी ५१ कोटी दान केले होते.

यापुर्वी क्रिकेट क्षेत्रातुन भरपुर मदत कोरोना पीडीतासाठी करण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धेतील पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन, जेसन बेऱ्हेंडॉर्फ अशा विदेशी खेळाडूंनी ही मदत केली होती. तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा या दोघांनी राबवीलेल्या एका मोहिमेअंतर्गत ११ कोटीपेक्षा अधिक रकमेची मदत त्यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात दान केली आहे. यात त्यांनी स्वत: २ कोटींचे दान दिले. याशिवाय हार्दिक,कृणाल पंड्या, रिषभ पंत, सचिन तेंडुलकर, इरफान आणि युसुफ पठाण, गौतम गंभीर, जयदेव उनाडकट, शिखर धवन, लक्ष्मीरतन शुक्ला, आर अश्विन अशा भारतीय क्रिकेटपटुंनी मदत केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!