मुंबई : गेल्या काही दिवसापासुन भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर काही काळासाठी भारतीय संघ सुट्टीवर गेला होता. यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ विलगीकरणात पोहोचणार होता, मात्र यापुर्वी भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला कोरनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर बीसीसीआयने तातडीने इंग्लंड दौऱ्यावरील खेळाडूना एक पत्र लिहीले आहे. या पत्रात संघातील सर्व खेळाडूंना कोरोनाचे नियमाचे काटोकोरपने पालन करण्याचे आदेश दिले आहे. तसेच खेळाडूंना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास सांगितले आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. एका खाजगी वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.
यादरम्यान रिषभ पंतविषयी बोलताना ते म्हणाले, ‘कोरोनाची लागण झालेला खेळाडू हा गेल्या आठ दिवसापासुन विलगीकरणात उपचार घेत आहे. संघातील इतर खेळाडूंसोबत तो हॉटेलमध्ये नाहीये. त्यामुळे इतर कोणत्याही खेळाडूला कोरोनाची लागण झाली नाही. पंत भारतीय संघासोबत डरहम येथे जणारा नाही.’ असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या ५ ऑगस्टपासुन भारतीय संघ इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे नाराजी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया !
- ओबीसी आरक्षणप्रश्नी भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट !
- कोरोनाची लागण झालेला तो भारतीय खेळाडू रिषभ पंत?
- ‘…यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील’, राणेंनी लगावला मुख्यमंत्र्यांना टोला
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

