🕒 1 min read
मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले.
‘आपण आपलं घर कशाला सोडायचं, ज्यावेळी छत अंगावर पडेल त्यावेळी पाहू. माझा नेता मोदी, माझा नेता अमित शाहा. आपण कशाला घाबरायचं?’ असं म्हणत पंकजा मुंडेंनी राज्य नेतृत्वाला सुनावलं आहे. त्यांचा इशारा हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच होता असा एकूणच निष्कर्ष निघत आहे.
यावर आता प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजाताईंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासे केले आहेत. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही’, असं म्हणत पंकजा मुंडे यांच्या विषयावर फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणप्रश्नी भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट !
- कोरोनाची लागण झालेला तो भारतीय खेळाडू रिषभ पंत?
- ‘…यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील’, राणेंनी लगावला मुख्यमंत्र्यांना टोला
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

