Share

‘…यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील’, राणेंनी लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कमाल केली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावलं आहे. प्रश्नम या संस्थेने महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 13 राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेतला होता. सुमारे 17,500 मतदारांनी सहभाग नोंदवलेल्या या सर्वेक्षणात सर्वाधिक मतदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शवली आहे. कोरोना काळात केलेल्या कामावरून जनतेने हा कौल दिला आहे.सर्वेक्षणानुसार असं समोर आलं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

सर्वेक्षणात जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं मत व्यक्त केलं आहे. ठाकरे यांच्या नंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना 44 टक्के पसंती मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्र्यांचं काम कसं वाटतं? त्यांच्या कामाची पद्धत वाढवते का? असा प्रकाराचे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांपुढे 4 ऑप्शन देण्यात आले होते. त्यानुसार मतदारांना त्याची निवड करायची होती.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे कौतुक काहीजण करत आहेत तर काहीजण आता मुख्यमंत्र्यांवर टीका करू लागले आहेत. भाजपनेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ३ राज्यातील १७ हजार लोकांनी मतं दिली, भारताची लोकसंख्या १३० करोड आहे, महाराष्ट्राची जवळपास ११.५ करोड आणि राज्य २९ आहे. यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील असं म्हणत जोरदार टोला लगावला आहे.

दुसऱ्या बाजूला मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी त्यांच्यावर खोचक टोला लगावला आहे. दीड वर्षात मुख्यमंत्र्यांनी काय काम केलं ? असा सवालही विचारला.संदिप देशपांडे म्हणाले की, ‘आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो कधीच अभ्यास करत नव्हता, पण वर्गात पहिला यायचा. एकतर तो खूप हुशार होता किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला व्हायचा. असेच मुंख्यमंत्र्यांचेही झाले आहे,’ अशा शब्दात संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्यांना टोला लगावला. तसेच, नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात मुख्यमंत्र्यांनी केलं तरी काय?’ असा सवालही विचारला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!