Share

कोरोनाची लागण झालेला तो भारतीय खेळाडू रिषभ पंत?

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसापासुन भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर काही काळासाठी भारतीय संघ सुट्टीवर गेला होता. यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ विलगीकरणात पोहोचणार होता, मात्र यादरम्यान दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या दोन भारतीय क्रिकेटपटुपैकी एक खेळाडू हा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा असल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यातील न्युझीलंडविरुद्धच्या डब्ल्युटीसी सामन्यात रिषभ पंत हा भारतीय संघाचा सदस्य होता. डब्ल्युटीसी सामन्यानंतर भारतीय संघ २० दिवसाच्या सुटीवर गेला होता. रिषभ पंत यावेळी युरो कप स्पर्धेचा आनंद घेत असल्याचे आढळले होते. मात्र या वृत्ताला अद्यापही अधिकृत दुजोरा मिळाला नाहीये.

रिषभ पंत व्यतिरिक्त रोहित शर्मा,अजिंक्य रहाणे, केएल राहुल, इशांत शर्मा, अनुष्का-कोहली हे खेळाडू लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले होते. जसप्रीत बुमराह त्याची पत्नी संजना गणेशनसोबत युरो कप सेमी फायनल बघण्यासाठी गेला होता. तर कोच रवी शास्त्री यांनी विम्बलडन सामन्यांचा आनंद घेत असल्याचे आढळले. या वेळी एकही भारतीय खेळाडू मास्क परिधान केलेला आढळला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!