Share

रोहित शर्मा सिडनीमध्ये सुरक्षित असल्याचा बीसीसीआयचा खुलासा

Published On: 

ऑस्ट्रेलिया : गेल्या काही दिवसांपासून सिडनीमध्ये कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. व हिटमॅन रोहित शर्मा देखील काही दिवसांपासून सिडनीमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. त्यामुळे चात्यांकडून रोहित बरा आहे कि नाही याबाबत चिंता व्यक्त करत होते दरम्यान बीसीसीआयकडून रोहित शर्माबाबतचं अपडेट देण्यात आलं. रोहित शर्मा पूर्णपणे सुरक्षित, अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे असं बीसीसीआयनं सांगितलं आहे.

‘आयपीएल’ दरम्यान मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला काही साखळी सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळेच रोहितची ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली न्हवती. त्यांनांतर काही दिवसांनी रोहित फिटनेस चाचणीत पास झाला. व रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला निघाला होता.

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेला ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर सिडनी येथे रोहित शर्माला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. रोहित शर्माचे क्वारंटाइनमधील अखेरचे काही दिवस बाकी आहेत. तो सध्या सिडनीमध्येच एका हॉटेलमध्ये आहे. संघ व्यवस्थापन सातत्याने रोहितच्या संपर्कात आहे. तो विलगीकरणात तसेच बायोबबलमध्ये आहे. तो आपल्या रुममध्ये एकटाच आहे. तिथे जर काही वाईट परिस्थिती निर्माण झाली आणि रोहितला जर सिडनीमधून बाहेर काढायचे असेल तर ते प्रयत्नदेखील करण्यात येतील, असा खुलासाही बीसीसीआयने केला आहे.

सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा उपस्थित असणार आहे. सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीही वाईट परिस्थिती निर्माण झाली नाही तर रोहितला सिडनीमध्येच रहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!