मुंबई : गेल्या वर्ष भरापासून जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घटल असून अनेकांचे या आजाराने बळी गेले आहेत. जवळजवळ सर्वच देशांत कोरोनाने कहर माजवला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे भय कमी झाले असले तरी संकट मात्र कायम आहे. काही दिवसांपासून कोरोना लसींबाबत दिलासादायक वृत्त हाती येत आहेत.
दरम्यान, आता दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या अन्नाथे या चित्रपटाच्या सेटवर ८ जणांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर येत आहे. त्याचसोबत रजनीकांतदेखील क्वारंटाइन असल्याचं सांगण्यात येत आहे.
‘इंडिया टुडे’नुसार, रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी अन्नाथे या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीमध्ये १४ डिसेंबरपासून हे चित्रीकरण सुरु होतं. मात्र, सेटवर ८ जण करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हे चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. तसंच रजनीकांत हे हैदराबादमध्ये क्वारंटाइन होतील किंवा चेन्नईला देखील परत येऊ शकतात”, असं रजनीकांत यांचे प्रवक्ते रियाज अहमद यांनी सांगितल आहे.
महत्वाच्या बातम्या
- आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचंय त्यामुळे जुळवून घ्या; अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
- शेतकरी आंदोलन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मध्य प्रदेशात जोरदार स्वागत
- तिढा सुटणार? मेट्रो कारशेडप्रकरणी शरद पवारांनी लक्ष घालावं; शिवसेना मंत्र्याची मागणी
- ‘हिंदुस्थानला पहिल्या कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही, तेथे दुसऱ्या कोरोनाचे काय घेऊन बसलात?’
- राष्ट्रवादीत ‘या’ नेत्याच्या प्रवेशाने अंतर्गत दुफळी! फूट वाढणार की शमणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

