Share

ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशाबाबत बीसीसीआयने दिले ‘हे’ सुचक उत्तर

Published On: 

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने दैदीप्यमान कामगीरी केली. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताने या स्पर्धेत सर्वात जास्त म्हणजे ७ पदके पटकावली. यात एक सुवर्णपदक, दोन रौप्य आणि चार कांस्यपदक आहेत.

ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताच्या दैदीप्यमान यशानंतर पुन्हा क्रिकेटचा समावेश खेळाच्या या महाकुंभात करण्यात यावा अशी मागणी क्रिकेट प्रेमी करत आहेत. यावर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना प्रश्न केला असता त्यांनी असे झाल्यास आमचा पुर्ण पाठिंबा असणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले.,’ऑलिम्पिक स्पर्धेत जर क्रिकेटचा समावेश होत असेल तर आमचा पुर्ण पाठिंबा आहे. जर स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला तर भारतीय संघ नक्कीच सहभागी होईल’ असे त्यांनी संगितले.

यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले,’बीसीसीआय आणि आयसीसी दोन्ही संघटनाचे ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट समावेशाबाबत एकमत आहे. जर भारतीय ऑलिम्पिक असोसीएशनने हस्तक्षेप नाही केला तर २०२८ ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश नक्की होईल.’ असे ते म्हणाले. यापुर्वी १९०० साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!