Share

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शकिब अस हसनने ओलांडला मैलाचा टप्पा, अशी कामगीरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Published On: 

मुंबई : आगमी टी-२० विश्वचषकाची तयारीसाठी बांग्लादेशच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला अखेरच्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बांग्लादेशने दिलेल्या १२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ अवघ्या ६२ धावांवर अटोपला. यासह बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात ४ गडी बाद करत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा गोलंदाज आणि पहिला फिरकीपटू ठरला आहे. ८४ टी-२० सामन्यात २१च्या सरासरीने शकिबने १०२ गडी बाद केले आहे. यात त्याने एकाच सामन्यात चार वेळा ४ आणि एक वेळेस ५ गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. तर १०० गडी बाद करणाऱ्या गोलंदाजात पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा आहे. त्याच्या नावे ८४ आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०७ गडी बाद केले आहे.

याव्यतिरिक्त शकिबने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ९ अर्धशतकासंह १,७१८ धावांही केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० गडी आणि १००० धावा अशी दुहेरी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. सर्वाधीक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत शकिब अल हसननंतर ९९ बळीसंह न्युझीलंडचा गोलंदाज टीम साउदी हा आहे. तर चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा क्रिकेटपटु शाहिद आफ्रिदी(९८) हा आहे. भारताकडून युजवेंद्र चहलने सर्वाधीक ६३ गडी बाद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!