Share

कोरोना संकटात ही बँक देणार ग्राहकांना मोफत रेशन

Published On: 

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार बुडाले यामुळे अनेक लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. यअयामुळे सामान्य माणूस आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशातच आता एका बँकेने मानवतेच्या दृष्टीने आपल्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँकेने आपल्या ग्राहकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बँकेने ‘घर घर रेशन’ या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आणि अल्प उत्पन्न असलेल्या ग्राहकांना बँक मदत करणार आहे.

बँकेने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या ५० हजार अल्प उत्पन्न असलेल्या ग्राहकांची या योजनेसाठी निवड केली आहेय या ग्राहकांना रेशन किट देण्यात येत आहे. या किटमध्ये १० किलो तांदूळ, पीठ, दोन किलो डाळ, १ किलो साखर आणि मीठ, १ किलो खाद्यतेल मिश्र मसाल्यांचे एक पाकिट आणि बिस्कीट देण्यात येणार आहे.

या बँकेकडून महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आतापर्यंत १ हजार रेशन किट यशस्वीरीत्या प्रदान करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात कर्मचारी रेशन किट घरोघरी जाऊन वितरित करत आहेत. बँकेकडून वाटप करण्यात येत असलेल्या या रेशन किटचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँकेचे ग्राहक असल्याच बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क करू शकता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!