Share

जी-७ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा ‘वन अर्थ, वन हेल्थ’चा नारा

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार ब्रिटनमध्ये होत असलेल्या जी-७ परिषदेमध्ये व्हर्चुअली सहभागी झाले. ब्रिटनने दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान मोदी यांनी जी-७ शिखर संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ‘वन अर्थ वन हेल्थ’ चा मंत्र दिला. जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांनी देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करत त्यांच्या या विचाराला पाठिंबा दिला.

आऊटरिच येथे सुरू असलेल्या या संमेलनात ऑनलाइन भाषण करताना मोदींनी भारताच्या सामाजिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. तसेच भारताच्या उद्योग, समाज आणि सर्वच स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असो किंवा लसीचे व्यवस्थापन, यात भारताने केलेल्या डिजिटल यंत्रणेच्या यशस्वी उपयोगाची माहिती त्यांनी दिली. जागतिक आरोग्य सुधारणेसाठी एक पृथ्वी-एक आरोग्य हा संदेश गेला पाहिजे, असे ते म्हणाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जी-७ राष्ट्रांनी केलेल्या सहकार्याबद्दल मोदींनी आभार मानले.

२०२० मध्ये कोरोनामुळं जी-७ बैठक रद्द केली होती. भारताकडून पंतप्रधान मोदी यांच्या आधी मनमोहन सिंह आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील जी-७ मध्ये सहभाग घेतला होता. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००३ मध्ये या परिषदेत सहभाग घेतला होता तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे २००५ ते २००९ असे सलग पाच वर्ष या परिषदेत सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!