🕒 1 min read
अमरावती : यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाहीये. असा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. परंतु या निर्णयाला आता अनेकांनी विरोध दर्शवला असल्याचे पाहायला मिळत आहे.
सरकारने आम्हाला तुरुंगात डांबले तरी चालेल. परंतु अमरावती जिल्ह्याची ज्ञानोबा-तुकोबा पालखी पायी वारी करीतच पंढरपूरला पोहोचेल, अशी माहिती विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेट्ये यांनी दिली.
येत्या आषाढी एकादशीला (२० जुलै) मानाच्या दहा पालख्यांनाच पंढरपुरात येऊ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. शिवाय या मानाच्या दहा पालख्यांमधील सहभागी होणाऱ्या भाविकांना पायी नव्हे तर बसने त्याठिकाणी यावे लागणार आहे. या पालख्यांमध्ये अमरावतीच्या ज्ञानोबा-तुकोबा पालखीचाही समावेश आहे. परंतु यातील सहभागी वारकरी मंडळी बसने पंढरपुरात जाण्यास तयार नाही. आम्ही नेहमीप्रमाणे पायी चालतच पंढरपूरला पोहोचणार, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे सरकारने येत्या २४ जूनपर्यंत फेरविचार करावा, असे विश्व वारकरी सेनेने स्पष्ट केले आहे.
सरकारने मध्यंतरी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’हे ब्रीद स्वीकारून नागरिकांना कोरोनाची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले होते. याची आठवण करून देत गणेश महाराज शेट्ये यांनी २४ जूनपर्यंत सरकारचा निर्णय न बदलल्यास आम्ही ‘माझी वारी-माझी जबाबदारी’ यानुसार आमचा मार्ग निवडू असे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
निर्णयासंदर्भात राज्य सरकारने पुनर्विचार करावा
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ‘यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. सरकारने हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील,’ असा इशारा त्यांनी दिला आहे. तर आता आषाढी वारीच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी देहू संस्थानच्या विश्वस्तांनी केली आहे.
कुंभमेळ्यासारखी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून
वारीची परंपरा टिकली पाहिजेत. पण कुंभमेळ्यात जे घडलं, त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. ‘वारकरी पोलीस, प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि इतरांशी चर्चा करुनच राज्य सरकारने वारीचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा टिकली पाहिजे, पण सध्या करोनाची सावटही आहे. त्यामुळं वारीला गेल्यानंतर पुढे होणाऱ्या विधीला शिथिलता देण्यात आली आहे,’ अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- जी-७ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा ‘वन अर्थ, वन हेल्थ’चा नारा
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
- ‘द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये उभी केली युवा खेळाडूंची भक्कम वॉल’; डेव्हिड वॉर्नरने केली स्तुती
- कोरोना प्रादुर्भावामुळे वॉर्नर आणि स्टॉयनीसची ‘या’ लीग मधुन माघार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
