Share

बनावट औषधी तयार करून विक्री करणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

Published On: 

औरंंगाबाद : बनावट औषधाचे उत्पादन करून त्याची साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणात संतोष सुदाम घोंडगे (वय ३७, रा. गावठाण भालवणी ता. पारनेर जि. अहमदनगर) याने सादर केलेला नियमीत जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. भोसले यांनी फेटाळला.
अन्न व औषध विभागाचे अधिकारी जीवन दत्तात्रय जाधव (वय ४२) यांनी ६ जानेवारी रोजी पेन्शनपुरा, नूतन कॉलनी येथील सुजल इन्टरप्रायजेसच्या पेढीची नियमीत तपासणी करित असतांना, त्यांना अनेक हॅन्ड सॅनिटायझर व इतर औषधी मिळुन आले.

त्यांनी सदरील सॅनिटायझर व औषधींबाबत चौकशी केली असता ते अभिषेक सुरेश बेल्हेकर यांच्या नवीन एसटी कॉलनी येथील अभिराज इंटरप्रायजेस कडून खरेदी केल्याचे सुजल इन्टरप्रायजेसच्या मालक राखी संतोष तोतला यांनी सांगितले. त्यानुसार फिर्यादीने पडताळणी केली असता, अभिराज इन्टरप्रायजेस अस्थित्वात नसल्याचे समोर आले.

त्यानंतर फिर्यादीने सदर औषधांच्या लेबलवरुन उत्पादकाचे नाव व उत्पादकाचा परवाना बाबत पडताळणी केली असता ही बनवाट औषधी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी राखी तोतला, अभिषेक बेल्हेकर आणि इतर आरोपींनी बनावट औषधाचे उत्पादन केले. या औषधात मिथेनॉल हे विषारी घटक होते. त्यामुळे सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका उत्पन्न होईल. असे कृत्य करत शासनाची फसवणूक केली. प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!