Share

महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरास ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Published On: 

मुंबई : ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे दरम्यान सोमवारी सायंकाळी कासारवडवली भागात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची तीन बोटे तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर कासारवडवली पोलिसांनी फेरीवाला अमरजीत यादव याला अटक केली होती. हल्ला करणाऱ्या अमरजित यादव या हल्लेखोरास ठाणे न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या हल्लेखोरावर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नसल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी बोलताना दिली.

तसेच मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयाने यादव याला ४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर यादव याच्या यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात होते. मात्र प्राथमिक तपासात त्याच्यावर एक गुन्हा यापूर्वी दाखल नाही. तसेच त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!