Share

जायकवाडीत भर उन्हाळ्यात फ्लेमिंगोचे आगमन

Published On: 

औरंगाबाद :  मागच्या पावसाच्या मौसमात खुप चांगला पाऊस झाला. यामुळे जायकवाडी धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे धरणामध्ये देश – विदेशातुन येणाऱ्या पक्षांसाठी लागणारे खाद्य हे दलदलीमध्ये आढळते. परंतू पाण्याचे प्रमाण आता आेसरायला लागल्याने मोसमानंतर दोन महिने उशिरा येथे फ्लेमिंगोसह गिल बिल्ड टर्न, कॉमन टर्न, रिव्हर टर्न, विस्कर्ड टर्न आणि कॅसपीयन टर्न देखील मोठ्या प्रमाणात आढळले आहेत.

दरवर्षी जायकवाडी  येथील पक्षी अभयारण्यात खुप मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत पक्षी येतात. या मध्ये फ्लेमिंगो खुप मोठया प्रमाणात येतात. परंतू यंदा वाढलेले पावसाचे प्रमाणामुळे यांच्या स्थलांतरावर परिणाम करणारा ठरला.  साधारण हे पक्षी हिवाळ्याच्या मौसमात येत असतात. तर ते आता मार्च महिन्यामध्ये म्हणजेच भर उन्हाळ्यात आले आहेत.  पावसाळा संपल्यानंतर हळुहळु देश – विदेशातील पक्षी येण्याला सुरुवात होते. दरम्यान गुजरात, भोपाळ, सौराष्ट्र, दक्षिणेमधील राज्यामधून हे पक्षी खुप मोठ्या प्रमाणात येत असल्याच्या नोंदी आहेत.

दरम्यान माजी मानद वन्यजीव डॉ. दिलीप यार्दी आणि पक्षी मित्र कुणाल विभांडीक हे गेले असता त्यांना हे जायकवाडी येथील पक्षी अरण्यामध्ये मुक्तपणे संचार करताना आढळुन आले. या वेळी विशेष म्हणजे कॅसपीयन टर्न खुप दिवसांनी आढळला आहे.   त्याचबरोबर १५० फ्लेमिंगो, पॅरिटीयन कोल तसेच बदकांच्या विविध जाती स्पॉट बील्ड डक, युरेसीयन वेगन, नॉर्थ पिनटेल या बदकांच्या जाती देखील आढळल्या. तसेच युरेशीयन स्पून बील, इबीस, आेपन बील, इग्रेट हे पक्षी देखील खुप मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. दरम्यान धुर्त समजल्या जाणारा भारतीय कोल्हाचे दर्शन या वेळी झाले हे विशेष म्हणावे लागेल. पक्षी हे प्रतिकुल परस्थितीतून अनुकुल परिस्थितीत नेहमी जात असतात. तर पश्चिम घाटातील गोवा या जास्त पावसाच्या प्रदेशातून कमी पावसाच्या प्रदेशात ते स्थलांतर करत असतात. यालाच स्थानिक स्थलांतरीत पक्षी असे म्हणतात असे या वेळी माजी मानद वन्यजीव रक्षक डॉ. दिलीप यार्दी यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतांना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!