भोपाळ : जेव्हा जेव्हा देशात कोणतंही संकट निर्माण होत तेव्हा तेव्हा आपल्या देशाचं सैन्य तिथे खंबीरपणे उभं राहतं. मग कोणत्याही राज्यात पूर आला असो वा भूकंप ! मदतकार्यासाठी सैन्य तिथे कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचतं. मग आता देश सर्वात मोठ्या अशा कोरोना संकटात असताना सैन्य मागे राहील असं होणारच नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर देशभरात आता पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. दररोज नव्या रुग्णांची रेकॉर्डब्रेक नोंद होत असून ऑक्सिजनचा साठा कमी पडत आहे. यामुळे केंद्र सरकारने मित्र राष्ट्रांकडून मदत मागितली असून भारतीय हवाई दल विविध देशांमधून ऑक्सिजन आयात करत आहे. अशातच, रुग्णांना बेड्स मिळत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहे.
यामुळेच, या संकटात काहीशी दिलासादायक बाब समोर आली आहे. भोपाळमध्ये सैन्य दलातर्फे ४८ तासांमध्ये आयसोलेशन सेंटर उभारलं आहे. यात, १५० बेड्सची सोय करण्यात आली असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबतच सैन्याचे जवान देखील रुग्णांच्या सेवेसाठी असणार आहेत. यातील ४० बेड्स हे महिला व बालकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे ४८ तासांमध्ये हे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आल्यानंतर सैन्य दलातर्फे देशभरात विविध ठिकाणी असे आयसोलेशन सेंटर उभारण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी देश जेव्हा संकटात असतो तेव्हा आम्ही खंबीरपणे उभे राहतो असे सांगत कोरोना हरणार, देश जिंकणार असा विश्वास देखील जनतेला दिल्यामुळे कोरोना विरोधातील लढाईत देशवासियांचा आत्मविशास अधिक वाढला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना साद घातली असून कोणत्याही कठीण परिस्थितीसाठी देशाच्या सेवेसाठी तयार राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने घोषणा केली ४० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची अन् दिले २६ हजारच; मंत्री शिंगणेंची माहिती
- ‘ठाकरे सरकारमधील नेते श्रेयासाठी हपापलेले, त्यामुळेच शिवसेना आणि काँग्रेसचे पित्त खवळले’
- महिलेचा छळ करणारा संजय राऊत हा विकृत माणूस, त्यांना अटक झालीच पाहिजे – निलेश राणे
- ‘रजनी सर म्हातारे होत आहेत म्हणून…’ जडेजाच्या कामगिरीनंतर धोनीचे ट्विट व्हायरल
- इशारा काय देता ? बदनामीचा खटला दाखल कराच; मुश्रीफांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
