🕒 1 min read
मुंबई : ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतील वाद आणखी वाढत चाललेला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यातल्या वाद आता साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांच्या दरबारात येऊन पोहोचला आहे.
प्राजक्ताने मध्यंतरी घेतलेल्या पत्रकार परिषेत खुलासा केला होता कि, मला मालिकेतून काढले नसून मी स्वतः ही मालिका सोडली आहे. मला सेटवरती शिवीगाळ झाली असून मी ही मालिका सोडली आहे. मला काढून टाकल्याच्या अफवा पसरवत आहेत हे चुकीचं आहे. पुढे ती म्हणाली तुमच्या मुलींसोबत असं काही घडलं असतं तर अलका ताई अशाच वागल्या असत्या का ?’ असा सवालही तिने उपस्थित केला होता. मालिकेबद्दल प्राजक्ताने बरेच खुलासे देखील केले.
दरम्यान ‘या’ मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी आता थेट रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. खासदार उदयनराजे यांनी अलका कुबल यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसोबत फोनवर चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केल्याची माहिती मिळाली आहे.
अलका कुबल यांनी प्राजक्ता गायवाडची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच मालिकेतील प्रमुख कलाकार रवी सांगळे यांना मालिकेतून काढून टाकावे अन्यथा साताऱ्यात सुरु असलेले ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोण आला रे कोण आला आरपीआय चा वाघ आला’
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे देखील मुख्यमंत्र्यांनच्या आवाहनाला समर्थन
- खडसे माघार घ्या, अन्यथा राष्ट्रवादीला याचे परिणाम भोगावे लागतील; ब्राह्मण महासंघाचा इशारा
- न्हावरेतील घटनेचा तपास गांभीर्याने करण्याची आढळराव पाटील यांची मागणी
- दिवाळीत फटाके वाजवण्यासंदर्भात मुंबई महापालिकेची अजब नियमावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
