Share

कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला. यामुळे संतापलेल्या सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेतली. लवकरच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार, तसेच याविरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी यावेली सांगितले. किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्यावरच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.

‘माझ्यावर आणि जावयांवर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून मला तर सोमय्यांच्या सीए पदवीवरच शंका येतेय, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला. मी त्यांना कोल्हापुरात येण्यापासून अडवले नाही, तर कायदेशीर प्रक्रियेचा भाग, आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून त्यांना पोलीस प्रशासनाने स्थानबद्ध केले होते. मी एकेदिवशी त्यांना कारखान्याचं पर्यटन आवर्जून करवतो, असेही मुश्रीफ यांनी म्हटले.

काय म्हणाले होते सोमय्या?
हसन मुश्रीफ यांचे जावई हे ब्रिक्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे बेनामी मालक आहेत. ही कंपनी आणि सरसेनापती कारखान्यामध्ये ५० कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे. या कंपनीत आलेले पैसे अपारदर्शक पद्धतीने आले आहेत. या व्यवहाराबद्दल काहीही माहिती नाही. एकूण १०० कोटींचा हा घोटाळा आहे असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!