मुंबई : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करताना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र शासनाने जाहीर केलेले पॅकेज सामान्य नागरिकांपर्यंत कधी पोहोचणार असा प्रश्न उपस्थित होत असताना कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे.
लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत येत्या आठ दिवसांमध्ये पोहोचवली जाईल, असे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली असून या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी कामगार विभाग काम करीत आहे. याशिवाय राज्यातील अनेक असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत कामगार विभाग पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. असे मुश्रीफ म्हणाले आहेत.
दरम्यान, ज्या घटकांकडे दुर्लक्ष झाले आहे अशा घटकांना देखील मदत देण्यात यावी यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होते. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी या पत्राद्वारे केली होती. शिंपी, नाभिक, परीट, लोहार, कुंभार, चांभार, सुतार यांच्यासह उर्वरित बलुतेदारांना मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी विनंती मंत्री वडेट्टीवार यांनी केली होती. आता मदत करतेवेळी वडेट्टीवार यांच्या मागणीचा किती विचार केला जातो याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मदतीचा हात ! पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य मिळणार
- औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याची सीमा सिल
- राज्य सरकारांना लस उत्पादकांकडून लस खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य
- जालन्यातील तिन्ही ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट; पाईपलाईनची संपूर्ण तपासणी
- घाटीत आज अठरा रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

