दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला फटकारले असून विरोधकांनी देखील हल्लाबोल केला आहे. अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लावण्यात येत असल्याने हातावर पोट असलेल्या नागरिकांसमोर पुन्हा एकदा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे टाळेबंदीमध्ये गरिबांसाठी करण्यात आलेल्या धान्याच्या मदतीनंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा ८० कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार २६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
कोरोना के बढ़ते प्रभाव को देखते हुए ₹26,000 करोड़ से प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना के अंतर्गत दो महीने तक 5 किलो अनाज देने के निर्णय पर @narendramodi जी का अभिनंदन करता हूँ। इससे देश के करीब 80 करोड़ लोगों को लाभ मिलेगा। मोदी सरकार इस आपदा में हर कदम देशवासियों के साथ खड़ी है।
— Amit Shah (@AmitShah) April 23, 2021
याबाबत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २६ हजार कोटी रुपयांच्या धान्याचे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत वितरण करण्यात येणार आहे. या निर्णयाबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. यामुळे देशातील ८० करोड जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.’ असं अमित शाह म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !
- चोराने कोरोना व्हॅक्सिन परत केली; जयंत पाटलांनी काळा बाजार करणाऱ्यांना झापलं !
- हृदयद्रावक : कोरोनाला हरवून आज मिळणार होता डिस्चार्ज अचानक आग लागली अन् होत्याचं नव्हतं झालं
- राज्यात सतराशे साठ लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय; ‘ई-पास’वरून चित्रा वाघ संतापल्या
- फरार बाबा नित्यानंदच्या ‘मालकी’च्या ‘कैलाश देशा’त पर्यटकांना येण्यास मनाई


