औरंगाबाद : घाटी रुग्णालयात आणखी आणखी अठरा रुग्णांचा कोरोनामुळे शुक्रवारी (दि.२३) मृत्यू झाले आहेत. त्यात औरंगाबादसह अहमदनगर, जालना जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आत्तापर्यंत घाटी रुग्णालयात १८३७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.
घाटीत आज दुपारी जाहीर केलेल्या अहवालानुसार औरंगाबाद मधील नंदनवन कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६२ वर्षीय स्त्री, बजाजनगर ६५ वर्षीय पुरुष, रामनगर ३० वर्षीय स्त्री, भडकलगेट ४६ वर्षीय स्त्री, वैजापूर बिलोनी येथील ४० वर्षीय पुरुष, वडगाव कोल्हाटी येथील ९५ वर्षीय स्त्री, पिंपळगाव येथील ७० वर्षीय स्त्री, कन्नड येथील ५० वर्षीय स्त्री, खुलताबाद, बोडखा येथील ७५ वर्षीय पुरुष, सिडको ७६ वर्षीय पुरुष, वैजापूर ४० वर्षीय पुरुष, सिडको एन-३ येथील ६४ वर्षीय पुरुष, बिलोली औरंगाबाद येथील ३५ वर्षीय पुरुष, सिल्लोड वसई येथील ६३ वर्षीय पुरुष तसेच जालना भोकरदन, टाकळी येथील १२ वर्षीय स्त्री, भोकरदन जालना येथील ४२ वर्षीय पुरुष, अहमदनगर, शेवगाव, तळणी येथील ३८ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनाने घाटीत मृत्यू झाला आहे.
मार्च महिन्यापासून औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. घराघरात बाधित रुग्ण आढळून येत आहे. मार्च महिन्यात तर रुग्ण संख्येने उच्चांक गाठला होता. या एका महिन्यातच ३२ हजार बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ३३ टक्क्यांवर गेला होता. मात्र प्रशासनाने होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करुन दिली.झाला त्यामुळे रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमधील रुग्णांचा ताण कमी झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हृदयद्रावक : कोरोनाला हरवून आज मिळणार होता डिस्चार्ज अचानक आग लागली अन् होत्याचं नव्हतं झालं
- चोराने कोरोना व्हॅक्सिन परत केली; जयंत पाटलांनी काळा बाजार करणाऱ्यांना झापलं !
- पाल गावासाठी कोरोनाची लस उपलब्ध करून द्या – भाजपा युवा मोर्चा
- देवेंद्रजी, राज्यातील जनतेशी बांधिलकी जपा, जनतेसाठी केंद्राशी दोन हात करायला पुढे या! – नाना पटोले
- महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवा ; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

