Share

जालन्यातील तिन्ही ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट; पाईपलाईनची संपूर्ण तपासणी

Published On: 

जालना: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील आिॅक्सजन गळतीच्या दुर्घटनेत निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी कालच सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार शासकीय रूग्णालयातील दोन तर एका खाजगी ऑक्सिजन प्लांटचे ऑक्सिजन ऑडीट करण्यात येत असून प्लांट ते रूग्णालयातील वार्डापर्यंत केलेल्या संपूर्ण पाईपलाईनची तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. प्लांटच्या ठिकाणी बाहेरील व्यक्तींनी प्रवेश करू नये म्हणून तेथे अगोदरपासूनच चोवीस तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रताप घोडके यांनी सांगितले.

ऑक्सिजन प्लांट असलेल्या ठिकाणी ऑक्सिजन ऑडीट कमेटी असते. जालन्यातही अशी कमेटी असून या कमेटीत डॉ. संतोष जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पद्मजा सराफ, संकेत पाटील, मुकादम मच्छिंद्र वाहुळ यांचा सहभाग आहे. ही कमेटी वेळोवेळी ऑक्सीजन पाईपलाईनची तपासणी करीत असते, ऑक्सीजनचा वापर कसा करायचा, कोणत्या रूग्णाला किती ऑक्सीजनची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!