हिंगोली: हिंगोलीत शेतीच्या वादावरुन धक्कादायक घटना घडली आहे. अर्धा एकर शेताच्या वादातून युवकाचा खून करण्यात आला. वसमत तालुक्यातील सोमठाणा येथे ही घटना घडली असून याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात मयताचा भाऊ व पुतण्या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच हा वादाची इतका शिंगेला गेला की एका युवकाचा दिवसाढवळ्या मारहाण करत खून करण्यात आला. सतत शेतीचा वाद होत आसल्याने हे पाऊल उचलावे लागले.
वसमत तालुक्यातील सोमठाणा येथील किशन तातेराव जगताप व त्यांचा भाऊ गणेश तातेराव जगताप यांच्यात मागील काही दिवसांपासून शेतीचा वाद होता. वडिलोपार्जित शेतीच्या वाटण्यानंतरही अर्धा एकरचा वाद सुरुच होता. त्यातून या दोघांत सतत वाद होत असत. अनेकवेळा भांडणेही झाली होती. यातच मंगळवारी रात्री शेताचा वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी किशन जगताप यांना त्यांचा भाऊ गणेश जगताप व पुतण्या अंकुश गणेश जगताप यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अर्धा एकर शेत दे, असे म्हणत त्यांच्या डोक्यात, छातीत व चेहऱ्यावर आरोपींनी दगडाने वार केले. यामध्ये किशन जगताप गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलीसांना झालेला प्रकार कळवण्यात आला आसता त्यांनी तातडीने धाव घेतली आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस उपाधीक्षक वसीम हाश्मी, विलास राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी गणेश जगताप, अंकुश जगताप यांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विवाह समारंभावर धडक कारवाई, ५० हजारांचा दंड वसूल,रिसॉर्ट सिल
- आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ससमोर आरसीबीचे तगडे आव्हान
- ‘आम्हाला दाभोळकरांचे संस्कार नको’;भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान
- पृथ्वी शॉच्या तडाख्यानंतर दिल्लीचा केकेआरवर ७ गडी राखुन दणदणीत विजय
- मुंबईत लसींचा तुटवडा, आजपासून पुढचे तीन दिवस लसीकरण बंद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
