Share

मुंबईत लसींचा तुटवडा, आजपासून पुढचे तीन दिवस लसीकरण बंद !

Published On: 

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.

परंतु सध्या कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने मुंबई महापालिकेला दैनंदिन लसीकरण मोहिमेचे काटेकोर नियोजन करुनही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सद्यस्थितीत उपलब्ध लससाठा संपुष्टात आल्याने उद्या शुक्रवार, ३० एप्रिल २०२१ ते रविवार २ मे २०२१ असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शनिवार पासून नियोजित १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुरेशा लससाठ्या अभावी पुढे ढकलले जाणार आहे.

मुंबईत लसीकरणासाठी ४५ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना काही केंद्रांवर रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून ४५ वर्ष व अधिक वयोगटातील सर्व नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळेल. त्यासाठी मनात संभ्रम ठेऊ नये. लससाठा उपलब्ध होताच प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे चिंताग्रस्त होऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर संकटाशी दोन हात करत असलेल्या भारताच्या मदतीसाठी अमेरिका धावून येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले आहेत. यापूर्वी अमेरिकेने भारताला कोविशील्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता अमेरिका भारताला थेट लसींचा पुरवठा करण्याच्या विचारात आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!