Share

‘आम्हाला दाभोळकरांचे संस्कार नको’;भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत तर कुठे ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर सारखी इंजेक्शन्स मिळत नसल्याचे चित्र आहे. अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे अनेकांचा प्राणास मुकावे लागत आहे.

नागपुरातील ८५ वर्षांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. मात्र मृत्युपूर्वी त्यांनी केलेला त्याग आज अनेकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्याच्या नेत्या शिवानी दानी यांनी या संदर्भात पोस्ट करून दाभाडकर यांच्या त्यागाची कहाणी प्रकाशात आणली होती.

उपचारासाठी बेड मिळावा यासाठी नागपुरातील ८५ वर्षीय भाऊराव दाभाडकर यांनी एका तरुणासाठी आपला बेड सोडला. त्यानंतर दोन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ‘आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही…’ असे वादग्रस्त ट्विट केले. त्यांच्या या ट्विटनंतर राज्यात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, नारायण दाभाडकर हे आरएसएसचे स्वयंसेवक होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही त्यांच्या त्यागाचं कौतुक करत मानवंदना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!