Share

आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ससमोर आरसीबीचे तगडे आव्हान

Published On: 

आहमदाबाद : आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्स आणि बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स आमने सामने असतील. गुणातालीकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या आरसीबीने स्पर्धेत केवळ एकच सामना गमावला आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्स संघाची कामगीरी काही विशेष नाही. पंजाबने केवळ दोन सामन्यात विजय मिळवत ४ सामन्यात पराभवाचे तोंड बघीतले आहे.

आरसीबी संघाची या स्पर्धेतील कामगीरी ही स्वप्नवत वाटावी अशी झाली आहे. सुरुवातीच्या सलग ४ सामन्यात आरसीबीने विजय मिळवला होता. मात्र चेन्नई विरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या संघाने सपशेल लोटांगण घातले. आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहली वगळता इतर फलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हीलीयर्सने आपल्या बॅटचा तडाखा चांगलाच दाखवून दिला आहे. सलामीवीर देवदत्त पडिक्कलही चागंल्या फॉर्मात आहे. तर गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल जोडीने चांगली कामगिरी केली आहे. सर्वाधिक गडी बाद करुन हर्षल पटेल हा पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे.

तर दुसरीकडे पंजाब किंग्सचा संघाची भिस्त ही संपुर्णपणे सलामीच्या फलंदाजीवर अवलंबुन आहे. कर्णधार के एल राहुल आणि मंयक अग्रवाल वगळता इतर फलंदाजाना फारशी चमक दाखवता आली नाहीये. ख्रिस गेलच्या कामगीरीत सातत्य नसल्याचा फटका संघाला बसत आहे. तर गोलंदाजीत अर्शदिप सिंगच्या कामगीरीत सातत्य नाही. मोहम्मद शमी वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला विशेष कामगीरी करता आली नाही. आजच्या सामन्यात निकोलस पुरणला संघाबाहेर बसवुन डेवीड मलनला संधी मिळण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवुन पंजाबचा संघ विजयाच्या मार्गावर परतण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!