Share

पृथ्वी शॉच्या तडाख्यानंतर दिल्लीचा केकेआरवर ७ गडी राखुन दणदणीत विजय

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य दिल्लीच्या संघाने ३ गडी गमावत १७व्या षटकात सहज पार केले. धडाकेबाज अर्धशतकासाठी पृथ्वी शॉला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या केकेआरची सुरुवात चांगली नाही झाली. सलामीवीर नितीश राणा १५ धावांवर बाद झाला. यानंतर शुभमन गील(४३) आणि राहुल त्रिपाठी (१९) यांनी केकेआरचा डाव सावरला. मात्र गील(४३), त्रिपाठी(१९), कर्णधार इयान मॉर्गन(०) आणि सुनील नरिन(०) लवकर बाद झाल्याने केकेआरचा डाव गडगडला. यावेळी आंद्रे रसलने (४५) दिनेश कार्तिक(१४) आणि पॅट कमिन्स(११) यांच्या साथीने केकेआरला १५० धावांच्या पार नेले. निर्धारीत २० षटकात केकेआरने ६ गडी गमावत १५४ धावापर्यंत मजल मारली. आंद्रे रसलने २७ चेंडुत २ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ४५ धावांची नाबाद खेळी केली.

केकेआरने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या सलामीवीरांनी तडाखेबाद सुरुवात करुन दिली. केकेआरचा गोलंदाज शिवम मावी टाकत असलेल्या डावाच्या पहिल्याच षटकात पृथ्वी शॉने सलग ६ चौकार मारत केकेआरला बॅकफुटवर ढकलले. अवघ्या ४ षटकात दिल्लीच्या सलामीवीरांनी संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. शॉ-धवन जोडीने पुन्हा एकदा दिल्लीच्या संघाला १३२ धावांची शतकी सलामी देत सामना आपल्या बाजुने फिरवला. पृथ्वी शॉने धडाकेबाज खेळी करत अवघ्या १८ चेंडुत अर्धशतक साजरे केले. शिखर धवन(४६) बाद झाल्यानंतर रिषभ पंतच्या(१६) साहाय्याने दिल्ली विजयाच्या दारात पोहचली. तेव्हा रिषभ पंत आणि शॉ बाद झाल्यानंतर स्टॉयनीस आणि हेटमायर यांनी अधीक पडझड न होऊ देता दिल्लीच्या संघाला सतराव्या षटकात विजय मिळवुन दिला. सलामीवीर पृथ्वी शॉने दिल्लीकडून ४१ चेंडुत ११ चौकार आणि ३ षटकारासह सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली. तर केकेआरकडून कमीन्सने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!