नवी दिल्ली : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसातही सुरूच आहे. याच दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात काल (सोमवारी) पुन्हा एका बैठक झाली.
आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक होती. या बैठकीमध्ये तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, कालची चर्चा देखील निष्फळ ठरल्याचे समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अद्यापही तोडगा निघालेला नसून पुढील बैठकीत तोडगा निघेल असा विश्वास बठकीला उपस्थित केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
एकीकडे देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे पंजाब-हरियाणातील शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 40 दिवसांपासून राजधानी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. सध्या उत्तर भारतात खूप थंडी आहे, तसेच दोन दिवसांपासून दिल्लीसह आसपासच्या परिसरात अवकाळी पाऊसही सुरुच आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं आहे.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांच्या आंदोलनावर परिणाम झालेला नाही. यावेळी, शेतकर्यांच्या आंदोलनाची काही छायाचित्रे समोर आली आहेत, जी लोकांच्या हृदयाला स्पर्श करत आहेत. दिल्ली, सिंघू बॉर्डर, टिकारी बॉर्डर आणि गाजीपूर बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. उत्तर भारतात भयानक थंडी तर आहेच, सोबत अवकाळी पाऊसही सुरु आहे. परंतु या आपत्तींमुळे शेतकरी मागे हटले नाहीत.
उलट त्यांनी त्यांचा लढा अधिक तीव्र केला आहे. आपत्ती उग्र रुप धारण करत असताना शेतकरी मागे हटण्याचं नाव घेत नाही हवामान खात्याचे म्हणणे आहे की, “शुक्रवारी दिल्लीत थंडीने गेल्या 15 वर्षांचा विक्रम मोडला आहे”. इतक्या थंडीतही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे.
महत्वाच्या बातम्या
- त्या ‘वर्षा संजय राऊत’ आहेत, त्या समर्थ आहेत; ईडी चौकशीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- मला बिझनेस नाही तर फक्त विज्ञान समजतं; कोवॅक्सिन उत्पादक कंपनीच्या प्रमुखांचं वक्तव्य
- आदर्श गाव हिवरे बाजारसह राळेगणसिद्धीत बिनविरोध नाही; अण्णांसह पोपटरावांना धक्का
- “ऑस्ट्रेलियन संघात पराभव पचवण्याची क्षमता नाही”, बायोबबल नियम संदर्भात ओझाची प्रतिक्रिया
- रोहित शर्माची उर्वरित कसोटी मालिकेत एन्ट्री तर ‘या’ खेळाडूची होणार एग्जिट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

