Share

आदर्श गाव हिवरे बाजारसह राळेगणसिद्धीत बिनविरोध नाही; अण्णांसह पोपटरावांना धक्का

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिताही लागू झाली आहे. तर, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपली असून सर्व उमेदवारांची मुख्य लढत आता स्पष्ट झाली आहे.

आदर्श गाव म्हणून आपली खास ओळख निर्माण केलेल्या हिवरे बाजार गावात देखील यंदा निवडणूक होणार आहे. तब्बल ३० वर्षे या गावातील निवडणूक ही बिनविरोध होत होती. शेवटची ग्रामपंचायत निवडणूक ही १९८५ साली झाली होती. त्यानंतर १९८९ साली सुरु झालेली बिनविरोध निवडणुकीची मालिका यंदा खंडित झाली आहे.

दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांना हिवरे बाजार ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अपयश आले आहे. राळेगणसिद्धीमधील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्यासह अण्णांनी देखील प्रयत्न केले होते. मात्र, त्यात यश आले नाही. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लंकेंनी तब्बल २५ लक्षणच्या निधींची घोषणा केली होती.

त्यांना पारनेर तालुक्यातील जवळपास १० ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास यश आले. राळेगणसिद्धीसह हिवरे बाजार गावात अण्णा हजारे व पोपटराव पवार या दोन्ही दिग्गज व्यक्तींना अपयश आल्याने मोठा धक्का बसला आहे. तर, जिल्ह्यामध्ये हा चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!