ऑस्ट्रेलिया : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा हिट-मॅन रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांसाठी मेलबर्नमध्ये टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर ८ गडी राखून विजय मिळवला.
यासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-१ ची बरोबरी साधली आहे. सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.
आगामी क्रिकेट कसोटीमधील रोहितच्या फलंदाजी क्रमाविषयी अनेकजण विचारात असताना ‘हिटमॅन’ पुन्हा एकदा सलामी फलंदाजाच्या रूपात टीम इंडियामध्ये सामील होताना दिसत आहे आणि त्याच्यासाठी मयंक अग्रवालची एक्झिट होणे जवळपास निश्चितच दिसत आहे.
रोहितला फॉर्मात नसलेल्या मयंकच्या जागी संघात स्थान दिले जाईल आणि मागील कसोटी सामन्यात पदार्पणानंतर प्रभावी दिसणार्या शुभमन गिलसह सलामीला मैदानात उतरेल. कसोटी मालिकेत पहिले सलामी फलंदाज पृथ्वी शॉच्या अॅडिलेड येथील अपयशानंतर छुट्टी झाली आणि शुभमन गिलला संधी मिळाली. आता,ऑस्ट्रेलियामधील अपेक्षेच्या दबावामुळे अग्रवालला देखील बाहेर पडावे लागताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- त्या ‘वर्षा संजय राऊत’ आहेत, त्या समर्थ आहेत; ईडी चौकशीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- मला बिझनेस नाही तर फक्त विज्ञान समजतं; कोवॅक्सिन उत्पादक कंपनीच्या प्रमुखांचं वक्तव्य
- आदर्श गाव हिवरे बाजारसह राळेगणसिद्धीत बिनविरोध नाही; अण्णांसह पोपटरावांना धक्का
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला औरंगजेबाबद्दल एवढं प्रेम का ?’
- “ऑस्ट्रेलियन संघात पराभव पचवण्याची क्षमता नाही”, बायोबबल नियम संदर्भात ओझाची प्रतिक्रिया


