ऑस्ट्रेलिया : सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित खेळवला जाईल. तत्पुर्वी भारतीय संघाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सुदैवाने सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आढळला आहे. तरीही भारतीय संघाला कोरोना प्रोटोकॉलमुळे सिडनीच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बोलताना भारताचा माजी खेळाडू प्रग्यान ओझाने प्रतिक्रिया दिली आहे की, ऑस्ट्रेलियन संघाला पराभव पचवणे अवघड जात असून त्यामुळे ते अशा चर्चांना उधाण देत आहेत.
मेलबर्न येथील दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू रोहित शर्मा, शुभमगन गिल, नवदीप सैनी, रिषभ पंत व पृथ्वी शॉ मेलबर्न येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यादरम्यान एका भारतीय चाहत्याने खेळाडूंचे हे बिल त्यांना न सांगता भरले व सोशल मीडियात त्या संदर्भात माहिती दिली. यानंतर मात्र ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने भारतीय खेळाडूंनी बायोबबल नियम मोडल्यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले. या एकूणच परिस्थितीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या व यादरम्यान ओझाने आपली प्रतिक्रिया देत ऑस्ट्रेलियन संघावर नाराजी व्यक्त केली आहे.
एका ऑनलाईन इंटरव्यू दरम्यान ओझा म्हणाला, “संपूर्ण जगाला माहिती आहे की ऑस्ट्रेलियन संघात पराभव पचवण्याची क्षमता नाही. त्यांना हे पचवणे अवघड जात आहे की, भारतीय संघाने आपल्या 5 प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्यांचा मेलबर्न येथे 8 विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाला वाटले की ते आरामशीर सामना जिंकतील, पण जे काही घडले त्याने ते आश्चर्यचकित आहेत. भारतीय संघ सध्या पूर्णतः मानसिक दृष्ट्या शांत असून ते पुढील सामन्याचे नियोजन करत आहेत.”
महत्वाच्या बातम्या
- त्या ‘वर्षा संजय राऊत’ आहेत, त्या समर्थ आहेत; ईडी चौकशीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- मला बिझनेस नाही तर फक्त विज्ञान समजतं; कोवॅक्सिन उत्पादक कंपनीच्या प्रमुखांचं वक्तव्य
- आदर्श गाव हिवरे बाजारसह राळेगणसिद्धीत बिनविरोध नाही; अण्णांसह पोपटरावांना धक्का
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला औरंगजेबाबद्दल एवढं प्रेम का ?’
- शेतकरी नेते कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम, तर पुढील बैठकीत तोडगा निघेल; केंद्रीय मंत्र्यांना विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

