🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
कोवॅक्सिन ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे. मात्र, या लशींवरून राजकारण देखील सुरु झाल्याची खंत भारत बायोटेकचे चेअरमन आणि एमडी डॉ. कृष्णा एल्ला यांनी व्यक्त केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच कोवॅक्सिन लशीला मंजुरी दिल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या लशीच्या सुरक्षितेबाबत आणि प्रभावाबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. यावर आज पत्रकार परिषदेमध्ये भारत बायोटेकतर्फे खुलासा करण्यात आला आहे.
‘लशीचं राजकारण केलं जातं आहे. माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याच राजकीय पक्षात नाही. मला बिझनेस नाही फक्त विज्ञान समजतं. मी प्रसारमाध्यमांना टाळतो असं नाही. मला प्रसिद्धी नको आहे’, असं म्हणत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये कोवॅक्सिनवरील आरोप फेटाळून लावले आहेत.
‘आतापर्यंत विकसित देशात झालेलं हे सर्वात मोठं ट्रायल आहे. आम्हाला अनुभव नाही असा आरोप आमच्यावर लोक करू शकत नाही. आम्ही एक जागतिक कंपनी आहोत. लशीबाबत आम्हाला खूप अनुभव आहे, संशोधनाचा खूप अनुभव आहे. आमच्या अहवालात पारदर्शकता नाही हे म्हणणं चुकीचं आहे’, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, ‘भारतीय कंपन्यांना लक्ष्य केलं जातं आहे. लशीच्या प्रभावाचं ट्रायल कुणीही केलं नाही पण आम्ही केलं. आम्हाला नियमांनुसारच मान्यता मिळाली आहे’ असा खंबीर दावा देखील त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- त्या ‘वर्षा संजय राऊत’ आहेत, त्या समर्थ आहेत; ईडी चौकशीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- ‘आता NCPने डोळे वटारले, कुणीही यावे टपली मारून जावे अशी शिवसेनेची केविलवाणी स्थिती’
- सरपंचपदाचा लिलाव : राज्य निवडणूक आयोगाने दिले चौकशीचे आदेश
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला औरंगजेबाबद्दल एवढं प्रेम का ?’
- पुणे-मुंबई महामार्गावर उड्डाणपुलांची गरज; सुनिल शेळकेंनी घेतली गडकरींची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

