Share

त्या ‘वर्षा संजय राऊत’ आहेत, त्या समर्थ आहेत; ईडी चौकशीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

ईडीने त्यांना 29 डिसेंबरला हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, वर्षा राऊत यांनी ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर होण्यासाठी अधिकचा अवधी हवा असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार, ईडीने त्यांना ५ जानेवारी म्हणजेच उद्या हजर होण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, त्या अचानकपणे आजच ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

सुमारे ३ तासांहून अधिक काळ ईडीतर्फे त्यांची चौकशी सुरु आहे. यावर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्या ईडी कार्यालयात गेल्यात हे मला तुमच्याकडूनच समजतंय. मला देखील हे माहित नव्हतं. त्या घरी आल्यावर अधिक माहिती समजेल. केंद्रीय तपासयंत्रणांचा आम्ही आदर करतो. त्यांचं नाव वर्षा संजय राऊत आहे. त्या ईडी चौकशीसाठी पूर्णपणे समर्थ आहेत. या चौकशीनंतरच काय ते समोर येईल. चौकशी सुरु असताना अधिक प्रतिक्रिया देणं योग्य नाही. आम्ही वा आमच्या सीएनी कोणतीही माहिती लपवलेली नाही’ असं देखील राऊत यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, आज काय चौकशी होणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं असून त्यांच्या अचानक हजर होण्याने चर्चांना देखील उधाण आलं आहे. प्रसारमाध्यमांना हुलकावणी देत त्या हजर झाल्या आहेत. यामागे गोंधळाची परिस्थिती निर्माण न होता ईडीला सहकार्य करण्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!