औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेचा सामना केल्यानंतर आता संभाव्य तिसर्या लाटेसाठी सर्व उपाययोजनांसह प्रशासनाने सज्ज राहावे. तसेच विशेष पूर्वतयारी ठेवावी, अशा सूचना लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सोमवारी (दि.२५) केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर सोमवारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात होणारी साप्ताहिक बैठक सोमवारी (दि.२४ )रोजी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनेची माहिती घेत आवश्यक सूचना केल्या. आ. सावे यांनी ५० खाटापुढील शहरी व ग्रामीण भागातील सर्व रुग्णालयांना स्वत:चे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करणे बंधनकारक करण्याचे सूचित केले.
म्युकरमायकोसिस उपचारासाठीच्या इंजेक्शनची उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याबाबत आ. सावे, आ. बागडे, आ. बोरनारे यांनी सूचित केले. आ. दानवे यांनी, तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विशेष पूर्वतयारी ठेवण्याचे सुचविले. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करावी व लग्न समारंभाच्या ठिकाणी नियमांचे पालन होण्यासाठी एक कॉन्स्टेबल नेमण्याबाबतही आ. दानवे यांनी सांगितले. आ. बागडे यांनी रामनगर येथील लसीकरण केंद्र सुरु ठेवावे तसेच जिल्ह्यातील मका खरेदी केंद्र सुरु करण्याची सूचना केली. आ. राजपूत, आ. बोरनारे यांनी दुसरा डोस घेणार्यांना वेळेत लस उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना केल्या.
डॉ. गव्हाणे यांनी जिल्ह्यातील वाढता संसर्ग आटोक्यात आणण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे सांगून बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले. कोरेानातून बरे झालेल्यांमध्ये सध्या म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण वाढत असून त्याच्यासाठी आवश्यक औषध, इंजेक्शनची उपलब्धता जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ठेवण्यासाठी राज्य शासनाकडे दैनंदिन इंजेक्शन मागणी रुग्णांच्या प्रमाणात नोंदण्यात येत आहे. प्राप्त इंजेक्शन रुग्णालयांना वितरीत करण्यात येत असल्याची माहिती दिली. दरम्यान, खा. इम्तियाज जलील हा बैठकीत उपस्थित नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सामंतांना माहितीये भाजपचं पुन्हा येणार, त्यामुळेच ते…’; निलेश राणेंच्या व्हिडीओने खळबळ
- पुणे : मंगेशकर रुग्णालयात सर्वसामान्यांना 900 रुपयात तर 200 डोस गरजूंना मोफत मिळणार
- शहर धूळमुक्त होण्यासाठी पालिकेच्या तीन स्विपिंग मशिन्स औरंगाबादकरांच्या सेवेत दाखल!
- ‘ते’ पुस्तक लिहिणाऱ्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही; संभाजीराजे आक्रमक
- ‘पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते’


