Share

‘पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते’

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई : पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांना मोठा तडाखा दिला.महाराष्ट्रातील कोकणाला या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. राज्य सरकार नुकसानग्रस्त भागाला काय मदत जाहीर करणार याकडे सर्वाचं लक्ष लागले होते. अखेर नुकसानग्रस्त भागात निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

‘तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. 21 मे रोजी त्यांनी कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता. कुणालाही वंचित ठेवणार नाही आणि व्यवस्थित मदत केली जाईल असे आश्वस्त केल्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.’ ट्विटर हँडल सीएमओ वरून ही घोषणा करण्यात आली आहे.

या घोषणेनंतर मात्र विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारेवर धरले आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. ‘अजून एक पोकळ आश्वासन… पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले एक कवडी दिली नाही, अनेक गावात अजून ही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत.’ अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही, असे आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!