औरंगाबाद : महापालिकेने शहरातील रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तीन बोलेरो माऊंटेड मिनी रोड स्विपींग मशीन खरेदी केल्या आहेत. या मशीनचे लोकप्रतिनिधींच्या हस्ते सोमवारी ( दि.२४) हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात लोकार्पण करण्यात आले. या स्वीपिंग मशीनमुळे शहरातील सर्व रस्त्यांची आता नियमित स्वच्छता केली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यातही नक्कीच भर पडेल.
पालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी शहराचा विकास करण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे. शहर स्वच्छ व सुंदरतेकडे त्यांनी अधिक लक्ष दिले आहे. शहरातील रस्ते धूळ मुक्त व्हावेत, यासाठी त्यांनी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेड प्रकल्पांतर्गत शहरातील शंभर किलोमीटर महत्त्वाचे ५२ रस्त्यांसह सर्व रस्त्यांवरील धुळ साफ करण्यासाठी तीन स्वीपिंग मशीन खरेदी केल्या आहेत. या मशीनचे लोकार्पण सोमवारी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
स्मार्ट सिटीतून खरेदी केलेली सिंगल-इंजिन वाहने स्वीपिंग ब्रशेस आणि व्हॅक्युमच्या ऑपरेशनसाठी वाहन इंजिनचा वापर करतात. साइड आणि सेंटर ब्रशेस धूळ गोळा करतात, जी नंतर व्हॅक्युमद्वारे पाईपमध्ये शोषली जाते. ५.२५ फूट रुंदीची मशीन्स ताशी २-३ किलोमीटर वेगाने रस्त्याची धूळ झाडू शकते. या मशीनमध्ये १.४ घन मीटर कॅपॅसिटीचे धूळ कंटेनर आहे. त्याचा टिपिंग एंगेल ४५ डिग्री आहे. प्रत्येक मशीनमध्ये दररोज १० ते १५ किलोमीटर रस्ते स्वच्छ करण्याची क्षमता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते’
- सत्ताधारी आणि विरोधक मार्ग काढण्याऐवजी टिका करण्यात व्यस्त; संभाजीराजेंनी व्यक्त केली खंत !
- ‘फ्लॅट, बंगलो, मोठ्या इमारतीत राहणारे लोक कोव्हिड सेंटरमध्ये कसे राहतील?’
- मुंबई महापालिकेप्रमाणे औरंगाबाद मनपा लस खरेदीसाठी काढणार ग्लोबल टेंडर!
- औरंगाबादेत ‘या’ खासगी रुग्णालयात १८ प्लस लसीकरण सुरु, एका डोससाठी तब्बल ९०० रुपये!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

