Share

Sanjay Raut : संजय राऊतांना मतदान केलेले 42 आमदार त्यांचे बाप आहेत का?, संजय गायकवाड आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा : राज्यात सत्ताबदल होत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना चांगलाच धारेवर धरलं होत. यानंतर आज बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राऊतांवर पलटवार केलाय. संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी संजय गायकवाड हे बुलडाणा येथील त्यांच्या मातोश्री कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

यानंतर पुढे संजय गायकवाड म्हणाले कि, शिवसेनेतील बंड पाहून खासदार संजय राऊत यांनी आमदारांना कुणाला डुक्कर म्हटलं, कुणाला रेडा म्हटलं, तर काही महिला आमदारांना वेश्या म्हटलं. काहींचे बाप काढले तसे आम्हीही त्यांचे बाप काढू शकतो आम्ही 42 आमदारांनी संजय राऊत यांना मतदान केलं, त्यामुळे त्यांनी सांगाव आता हे 42 आमदार त्यांचे बाप आहेत का? त्यामुळे त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर बोलावं. अशी सडसडून टीका संजय गायकवाड यांनी केली आहे.

तसेच पुढे प्रबोधनकार ठाकरे यांनी 1966 ला शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी जाहीर पणे सांगितले होते की, हा माझा बाळ मी माझ्या राष्ट्राला अर्पण करत आहे. बाळासाहेब ठाकरे हे देशातील 32 राष्ट्रपुरुषांपैकी एक राष्ट्रपुरुष आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुष कोणाच्या बापाचा नसतो. तो देशा चा असतो. त्यामुळे आमच्या बॅनर तसेच जे काही कार्यक्रम असतील त्याच्यावर बाळासाहेबांचा फोटो असणार म्हणजे असणार. त्याला आम्ही कोणी अडवू शकणार नाही, असं देखील संजय गायकवाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!