बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या बीड जिल्ह्यातील पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) औरंगाबाद विभागीय कार्यालयाने जप्त केले. त्याद्वारे ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली.
कारखान्याकडे मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळातील कर्मचारी व कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण १.४६ कोटी रुपये रक्कम थकीत होती. या कारवाईचे प्रकरण काल शुक्रवारी राज्यात चांगलेच गाजले होते.
दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बँक खाते जप्त झाले नाही, असे स्पष्टीकरण कारखान्याचे कार्यकारी संचालक जी.पी.एस दीक्षितुलू यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिले आहे. दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे.
अशा कठीण परिस्थितीत अशा प्रकारचे वृत्त माध्यमातून येत असून यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आणणे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे. कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही, असे पत्रकात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मालाडमध्ये झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरुवात; आ. भातखळकर पोलिसांच्या ताब्यात
- प्रेग्नेन्सीमुळे उर्मिला ट्रोल; हेमांगीनंतर तिचेही ट्रोलर्सला सडेतोड उत्तर
- टी-२० विश्वचषक! प्रबळ दावेदारच होऊ शकतात पहिल्या फेरीत स्पर्धेबाहेर
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गटांची घोषणा! ‘या’ संघाचा भारताच्या गटात समावेश
- स्मार्ट औरंगाबादच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना एएससीडीसीएल बोर्डाची मान्यता


