Share

मालाडमध्ये झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरुवात; आ. भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

Published On: 

मुंबई : मालाड कुरार येथे एमएमआरडीएकडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री 12 वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्यानंतर आज सकाळीच पोलिसांच्या लवाजम्यासह ही तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून या कारवाईला विरोध केला आहे.

दरम्यान, कुरार मेट्रो स्थानकाच्या कामासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या घरांवर कारवाई सुरु होती. यावेळी स्थानिकांनी ही बेकायदेशीर कारवाई असल्याचं सांगत विरोध केला. त्यावेळी स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी आ. अतुल भातखळकरही तिेथे पोहचले आणि त्यांनीही कारवाईला विरोध केला. भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केल्याने भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, आम्ही आंदोलन करणारच. हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. असं असतानाही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. याच्याविरोधात आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू, असं भातखळकर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!