Share

लवकरच भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला जेम्स बाँड सिरीजमधील २५ वा चित्रपट

Published On: 

मुंबई : भारतीय प्रेक्षकांची आतुरता आता लवकरच संपणार असून  डॅनियल क्रेग साकारात असलेला जेम्स बाँड या प्रसिद्ध अक्शन चित्रपट सिरीजमधील २५ वा चित्रपट या महिन्यात भारतीयांच्या  भेटीला येणार आहे. ‘नो टाईम टू डाय’ या बाँड पटात डॅनियल क्रेग शेवटचा जेम्स बाँड साकारणार आहे. हा ००७ एजंट भारतात ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात क्रेगसोबत रॅमी मालेक, साफीन, राल्फ फिनेस, लिआ सायडोक्स हे कलाकारही दिसणार आहेत. या चित्रपटाच्या नव्या  अँक्क्षन पॅक्ड ट्रेलरवरून या चित्रपटात जेम्स बाँड आपल्या निवृत्तीतून बाहेर येतो. या चित्रपटात अकॅडमी पुरस्कार विजेता अभिनेता रॅमी मालेक व्हिलन म्हणून काम करत आहे. त्यामुळे या चित्रपटाची चाहते अतुरतेने वाट पाहत आहे.

डॅनियल क्रेगचा हा शेवटचा जेम्स बाँड पट असून त्याने आतापर्यंत ताकदीने जेम्स बाँड साकारला आहे. नव्या ट्रेलरवरुन तो चित्रपटात धमाल करण्यासाठी सज्ज असल्याचे जाणवते. या चित्रपटात अकॅडमी पुरस्कार विजेता अभिनेता रॅमी मालेक व्हिलन म्हणून काम करत आहे. त्यामुळे या चित्रपटाची भारतीय सिनेरसिक, चाहत्यांमध्ये उत्सुकता पहायला मिळते आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!