Share

‘मुंबईचे पाप काय, की त्यांना शिवसेनेसारखा पक्ष मिळाला’, निलेश राणेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

Published On: 

मुंबई: राणे कुटुंबीय सतत काही न काही वादावरून शिवसेनेवर टीका करत असते. आता पुन्हा एकदा भाजप नेते निलेश राणे यांनी सेनेवर निशाना साधला आहे. त्यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

नेदरलँड येथील डच प्रांतात एका आठवड्यात एक पूल बांधला जातो. तोच पूल जर मुंबईत बांधायला गेले तर महानगरपालिकेला हे काम करण्यासाठी किमान ७ ते ८ वर्षे लागतील त्यात ३/४ कॉन्ट्रॅक्टर बदलतील, १०० कोटीचे काम २००० कोटी पर्यंत जाणार, स्थानिक नगरसेवक काम मागतील वेळ जुळत नाही म्हणून उद्घाटनाला एक दीड वर्षलागतील, काय पाप केले मुंबई शहराने की त्यांना शिवसेना सारखा पक्ष मिळाला.असे ट्वीट करत निलेश राणे यांनी सेनेवर निशाना साधला आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक नाट्यानंतर भाजप-सेनेत प्रचंड शाब्दिक वार पहावयास मिळाले. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत अधिक वाढ केली गेली आहे. राणे वादानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता निलेश राणे यांनी पुन्हा एकदा सेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!