Share

गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; न्यायालयाची सरकारला कायदा करण्याचा सूचना

Published On: 

अलाहाबाद – अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा सल्ला दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित केले जावे. भारतात गायीला माता मानले जाते. हिंदुंच्या श्रद्धेची बाब आहे. एखाद्या धर्माची आस्था दुखावल्याने देश कमकुवत होतो, असे न्यायालयाने म्हटले.

जावेद नावाच्या व्यक्तीला जामीन नाकारताना कोर्टाने ही टीप्पणी केली आहे. उत्तर प्रदेशातील गोहत्या बंदी अधिनियम कायद्यातंर्गत गुन्हा केल्याचा जावेदवर आरोप आहे. गाईला मूलभूत हक्क देण्यावरुन कोर्टाने महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.तसेच जेव्हा गायीचे कल्याण होईल तेव्हा देशाचे कल्याण होईल असं देखील कोर्टाने आदेशात म्हटलं आहे.

हायकोर्टाने म्हटलंय की, गायीला मुलभूत हक्क देण्यासाठी आणि राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यासाठी सरकारने ससदेत विधेयक आणावं. गायीचे रक्षण करणे हे कार्य केवळ एका धर्म पंथाचे नाही तर गाय ही भारतीय संस्कृती आहे. ही संस्कृती वाचवण्यासाठी कार्य देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने मग तो कुठल्याही धर्माचा असो त्याने केले पाहिजे.

‘गायीला मूलभूत अधिकार देण्यासाठी आणि राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करायला पाहिजे. जे गायीला इजा पोहोचवण्याबद्दल बोलतात अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी कायदा करायला हवा’, असं मत न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी नोंदवलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!