पुणे : पुणे महानगराला गणेशोत्वाची मोठी परंपरा आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीचे मोठे कार्य गणेश मंडळाच्या माध्यमातून होत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह पुणे जिल्हयातील गणेश मंडळांनी स्वीप कार्यक्रमामध्ये मतदार जनजागृतीसाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. स्वीप कार्यक्रमात गणेश मंडळाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश मंडळाचे अध्यक्ष व प्रतिनिधीसोबत स्वीप कार्यक्रम स्पर्धा तसेच मतदार जनजागृतीबाबत बैठक झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, मतदार नोंदणी अधिकारी संतोषकुमार देशमुख व सुरेखा माने उपस्थित होते.
देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मतदारजागृतीच्या प्रयत्नात गणेशमंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जनजागृतीचे मोठे कार्यही गणेश मंडळाच्या माध्यमातून होत आहे. युवा, दिव्यांग, शहरी नागरिक, स्थलांतरीत, ग्रामीण व आदिवासी नागरिक, तृतीयपंथी, तसेच महिला यांना मतदान प्रकियेत सहभागी करून घेण्यासाठी गणेश मंडळांनी स्वीप कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असं जिल्हाधिकाऱ्यांनि म्हटले आहे.
नवमतदारांची तसेच सर्व स्तरातील मतदारांची नोंदणी वाढविणेसाठी जनजागरुकता करून त्यांना निवडणुक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी गणेश मंडळाचा स्वीप कार्यक्रमातील सहभाग महत्त्वाचा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी स्वीप कार्यकमाची संकल्पना, कार्यक्रमाचे स्वरूप, सहभाग, सजगता, उददीष्टे सांगितली. तसेच उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; न्यायालयाची सरकारला कायदा करण्याचा सूचना
- मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती घेणार आज राष्ट्रपतींची भेट
- ‘मुंबईचे पाप काय, की त्यांना शिवसेनेसारखा पक्ष मिळाला’, निलेश राणेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
- ‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन
- एसटी तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आज लोकायुक्तांपुढे सुनावणी


