Share

जोश हेजलवुडची जोरदार धुलाई करत 19 वर्षीय यशस्वीने केली नव्या विक्रमाची नोंद

Published On: 

अबुधाबी : आयपीएल 2021 हंगामात शनिवारी डबल हेडरचा रोमांच रंगला. या दिवसातील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 17.3 षटकात 3 बाद 190 धावा करत 7 विकेटस्‌नी चेन्नईवर मात करत दमदार विजय मिळविला.

निर्धारित धावांचा पाठलाग करताना एविन लेवीस आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने 77 धावांची दमदार भागीदारी केली. ही जोडी जमली असताना एविन बाद झाला. त्याने 12 चेंडूत 27 धावा केल्या. त्यानंतर लगेचच यशस्वी 50 धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यानंतर शिवम दुबेने 42 चेंडूत नाबाद 64 धावा करत संघाला विजय चमकदार विजय मिळवून दिला. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं 19 वर्षांचा यशस्वी जयस्वाल विजयाचा हिरो ठरला. त्यानं सीएसकेच्या बॉलर्सची जोरदार धुलाई केली. यशस्वीनं 21 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 षटकार लगावत अर्धशतक झळकावलं.

यशस्वीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 11 वर्षांचा अनुभव असलेल्या जोश हेजलवुडची जोरदार धुलाई केली. त्यानं हेजलवुडच्या बॉलिंगवर मैदानातील चारही दिशांना फटकेबाजी केली. यासह यशस्वीनं त्याचं अर्धशतक फक्त 19 बॉलमध्ये पूर्ण केलं. आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा तो दुसरा अनकॅप खेळाडू बनला आहे. अनकॅप खेळाडूंमध्ये वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या इशान किशनच्या नावावर आहे. त्यानं 17 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!