🕒 1 min read
अबुधाबी : आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा चाहत्यांची हिरमोड केली. मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा निराशाजनक कामगिरी केली. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 129 धाव करता आल्या.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा 4 विकेट्सने पराभव झाला. या सोबतच मुंबईचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न देखील आणखी धूसर झाले आहे. अखेरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अश्विनने षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केला.
दिल्लीचा डाव
निर्धारित लक्ष्य गाठताना दिल्ली सुरुवातीला कोलमडली. अवघ्या 30 धावांवर त्यांचे 3 गडी तंबूत परतले. सलामीवीर शिखर धवन धावबाद झाला, पाठोपाठ पृथ्वी शॉ बाद झाला. यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरने डाव पुढे नेला आणि संघाचा स्कोर 57 धावांवर आणला. पंतने 22 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावा केल्या. तर अक्षर पटेल ट्रेंट बोल्टचा बळी ठरला. दिल्लीचा निम्मा संघ अवघ्या 77 धावांवर तंबूत परतला.
परंतु श्रेयस अय्यरने दिल्लीचा डाव सांभाळला. आणि एका टोकावर राहिला आणि संघाला विजय देऊनच परतला. रविचंद्रन अश्विनने विजयी षटकार मारल्यावर दिल्लीने 19.1 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले.
मुंबईचा डाव
मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमारने सर्वाधिक 33 धावा केल्या. तो वगळता इतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीच्या घातक गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज टिकू न शकल्याने आयपीएल स्पर्धा पाच वेळा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी हा सिझन साधारण गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंच्या शिर्डीत नवं शहर वसवण्याच्या घोषणेवर गडकरींची प्रतिक्रिया; म्हणाले…
- ‘धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करायला नको होते’, आ.सुरेश धसांची टीका
- फडणवीसांचा मराठवाडा दौरा अन् पंकजा मुंडेंची तब्येत बिघडली; राजकीय चर्चांना उधाण
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली, काही दिवस करणार आराम
- ‘जलसंपदाचे कुठलेली कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही’, मंत्री जयंत पाटलांची स्पष्टोक्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
