🕒 1 min read
पुणे – आज दुपारी 12 वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आधीच्या वर्गातील कामगिरी, इतर अभ्यास व निकष यांच्या आधारे यंदाचे निकाल लावले जात आहेत. दहावीसाठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी केले असून यातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून निकालाचे काम हे अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत होतं. आता अखेर उद्या बारावीचा निकाल हा खालील वेबसाइटवरून पाहता येणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे यामुळे दहावी प्रमाणेच बारावीच्या निकालालाही यंदा जवळपास एक-दीड महिना उशीर झाला आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट आउटही काढता येणार आहे.
बोर्डाच्या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच बारावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.
बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील
www.maharesult.nic.in
www.maharesult.nic.in
msbshse.co.in
hscresult.11thadmission.org.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाला धक्का! दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी सलामीवीर मंयक अग्रवाल बाहेर
- शहरातील विविध विकासकामाला गती देण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी घेतली बैठक
- बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप
- सावधानतेचा इशारा ; पुढचे २ महिने राज्यात जोरदार पाऊस कोसळणार
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
